रमेश मोरे
मनसेची आंदोलने खळ्ळखटट्याक म्हणुन सर्वांना परिचित आहेत.मात्र जुनी सांगवी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन कार्यालयात करसंकलन प्रशासन अधिकारी गेली दिड दोन महिन्यांपासून उपलब्ध होत नसल्याने मनसेकडून त्या अधिका-याच्या मोकळ्या खुर्चीला पुष्पहार घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.
या कार्यालयामध्ये गेली दीड महिन्यापासून प्रशासन अधिकारी उपलब्ध होत नसल्याने नागरीकांना गैरसोय व अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ही बाब लक्षात घेवून प्रशासनाचे या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे शहर उपाध्यक्ष राजु सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयात जाऊन होणा-या अडचणी बद्दल माहिती घेत प्रशासन अधिका-याच्या खुर्चीला पुष्पहार घातला.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.